प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर

प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर

भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी केलेले घोटाळे समोर आणत असतात. आज त्यांनी पुन्हा भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. याविषयी बोलताना किरीट सोमय्यांनी प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुख यांच्या वाटेवर असून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.

प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. शरद पवारांच्या आशीर्वादाने अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीने प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला, असे किरीट सोमय्या म्हणाले. त्यासंबंधीचे पुरावे बाहेर आले असून आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

चंद्रावर जाणार भारतीय वंशाचे अनिल मेनन

बापरे !! आत्महत्येची मशीन??

पेप्सीकोला शिकवला धडा; बटाट्याचे पेटंट रद्द

राज्याचे माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे ईडी चौकशीला उपस्थित राहिल्याबद्दल विचारले असता किरीट सोमय्यांनी सांगितले की, लाखो शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्यांच्या नावाने वळवण्यात आले. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटींची संपत्ती १३ कोटीत दिली गेली; तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केल्याचे सोमय्यांनी म्हटले.

Exit mobile version