प्रफुल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट

प्रफुल पटेलांनी घेतली राज्यपालांची भेट

सध्या महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती, तर आता प्रफुल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवरून विविध तर्क केले जात आहेत.

राज्यपालांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली होती. या बरोबरच ही भेट सुमारे एक तास चालली असल्याचे देखील या ट्वीटमध्ये सांगण्यात आले होते.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी आज भेट घेतली. त्यामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलें आहे.

हे ही वाचा:

क्रिकेट बुकी जालान म्हणतो, परमबीर सिंह यांनी माझ्याकडून खंडणी उकळली

७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा

आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल

मुंबईला मिळणार  ३०० ‘सुपर सेव्हर्स’ 

जबाबदारीचं पालन न करणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही: शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

बारामती येथे १४ मार्च रोजी पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले होते.

Exit mobile version