एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून नावलौकिक असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छापे मारले. तर या पोलीसी कारवाई करून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीकडून आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना “प्रदीप शर्मा हे ‘ब्रेन बिहाइंड द वाझे’ आहेत” असा हल्लाबोल केला आहे.
गुरवार, १७ जून रोजी सकाळी ६ वाजता माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छापे मारले आहेत. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण या अनुषंगाने हा तपास पार पडला. यावेळी शर्मा यांची चौकशीही एनआयएतर्फे करण्यात आली आहे. तब्बल चार तासांपेक्षा अधिक काळ हा तपास चालला असून यावेळी मुंबई पोलिसांचे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथकही हजर होते.
हे ही वाचा :
ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा
रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे
या साऱ्या कारवाईवरूनच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तोफ डागली आहे. प्रदीप शर्मा यांच्या कारवाई होईल किंबहुना त्यांच्यापर्यंत संशयाची सुई पोहोचेल हे अपेक्षितच होते. कारण वाझे यांच्यामागे ‘ब्रेन बिहाइंड द वाझे’ हे प्रदीप शर्मा आहेत हे सर्वश्रुत होते असे दरेकर यांनी म्हटले आहे. त्याच्यामुळे या दोन्ही प्रकरणांमध्ये गोष्टी प्रदीप शर्मा यांच्या घरापर्यंत पोहोचतील आणि निश्चित अनेक गोष्टींची उकल यानिमित्ताने तपासात होईल असे दरेकर म्हणाले.
'ब्रेन बिहाइंड द वाझे' हे प्रदीप शर्मा आहेत, हे सर्वश्रुत होतं!
त्यांच्या चौकशीतून आता अनेक गुपितं समोर येऊ शकतील#pradeepsharma pic.twitter.com/gDDpn8xWKT— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 17, 2021