आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने काही दिवसांपूर्वी या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट करत शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचे आरोप केले होते. पण या विषयात आता आणखीन एक नवा खुलासा समोर आला असून प्रभाकर साईलने खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी या संदर्भात हल्ला चढवला आहे.
मंगळवार, २६ ऑक्टोबर रोजी सकाळी मोहित कंभोज यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. मोहित कंबोज यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक संभाषण ऐकू येत आहे. या संभाषणात प्रभाकर साईल पैशासाठी हे सगळे करत असल्याचे म्हटले गेले आहे. के.पी गोसावी कडून पैसे उकळण्याचा प्रयत्नात प्रभाकर साईल होता असे या संभाषणात बोलले गेले आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांचा हात असल्याचेही म्हटले गेले आहे. तर मनोज नावाचा एक इसम यात सहभागी असल्याचेही म्हटले गेले आहे.
String Operation of Notary Ram Ji Gupta :
Ram ji says #PrabhakarSail Has Done All This For Money From Kiran Gosavi !
Clearly saying मियाँ Nawab and Manoj is Behind This !#AryanKhan https://t.co/XyzphQE2Xb pic.twitter.com/FMGYvquQ2r— Mohit Bharatiya ( Mohit Kamboj ) (@mohitbharatiya_) October 26, 2021
या व्हिडिओमध्ये कोणाचाही चेहरा दिसत नाहीये. तरी देखील हा व्हिडीओ राम गुप्ता यांचा असल्याचा सव करण्यात येत आहे. राम गुप्ता हे वकील असून त्यांनी प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्राचे नोटरी त्यांनी केलेले दिसत आहे. या व्हिडीओ वरून आता आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नवे कोणते वळण येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे
विधानसभेला कधी मिळणार ‘अध्यक्ष महोदय….’?
आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट
तर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदे घेत एनसीबीवर आरोप केले आहेत. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने आपल्याला निनावी पत्र पाठवल्याचे दावा नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान आज आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात कोर्टात सुनावणी देखील आहे. त्यामुळे आज तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? की तुरुंगातील मुक्काम लांबणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.