29 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणमविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

Google News Follow

Related

आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे. सामाजिक आर्थिक प्रगतीचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो. त्यामुळे हा गड जो आपण जिंकला आहे. पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या यात्रेत महाराष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करुन द्यायचं आहे. राज्यातील १२ कोटी जनतेची इच्छा होती की हे सरकार आलं पाहिजे. त्यांच्या मनातील संकल्पना आज आपण खऱ्या अर्थाने पूर्ण केलीय. गेली अडीच वर्षे आपली संघर्षात गेली. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या इतिहासात एक असं सरकार ज्यांनी अडीच वर्षे फक्त सूड उगवण्याचं काम केलं,अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमधील भाजपच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना केली.

मविआ सरकारच्या काळात एक अघोषित आणीबाणी राज्यात होती. आमच्याविरोधात बोलतात तर १०-१२ पोलीस ठाण्यात फिरवू, जेलमध्ये टाकू, असं सगळं सुरु होतं. अनाचार, भ्रष्टाचार, अत्याचाराची परिसीमा गाठली होती. तुमच्या विरोधात काही केले तर तो देशद्रोह कसा ? असा सवाल करत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला महाराष्ट्र चोरून नेला होता. मविआ सरकारच्या अडीच वर्षाच्या महाराष्ट्र मागे गेला होता. पण आता महाराष्ट्रात सत्तेचा गड जिंकण्यात यश आले आहे. राज्यात खरं हिंदुत्ववादी सरकार आले आहे. त्यामुळे आज खुला श्वास घेऊन आपण ही बैठक घेत आहेत. फक्त आपणच नाही तर महाराष्ट्रातील जनतेनही मोकळा श्वास घेतलाय, अशा शब्दात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.

रामभराेसे सरकारमुळे गती खुंटली

मी सांगायचो की सरकार चाललंय ते भगवान भरोसे चाललंय. त्यामुळे राज्याची विकासाची गती खुंटली होती. झालेलं परिवर्तन सत्तेसाठी नाही. तर महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी आहे. प्रगतीचं सगळी काम ठप्प होतं. विकासाची कामच आम्हाला करायची नाहीत. केंद्र सरकारने, मागील सरकारनं सुरु केलेली विकासाची कामं बंद करण्याचं काम त्या सरकारनं केलं.

९ वाजता बोलणारे आता कमी बोलायला लागले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना फडणवीस म्हणाले की, आपले सरकार आणण्यात राऊतांचाही वाटा असल्यामुळे त्यांचेही आभार मानले पाहीजे. ९ वाजता बोलणारे आता कमी बोलायला लागले आहेत. हा लाऊडस्पीकर बंद करण्यासाठी सत्ता परिवर्तन हाच एक उपाय असल्याचे सांगून फडणवीस यांनी राऊत यांना जोरदार टोला लगावला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

राष्ट्रीय पुरस्काराने वाढवली आणखी दर्जेदार चित्रपट निर्मितीची जबाबदारी

चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता
सत्य परेशान हो सकता है, सत्य प्रलंबित भी हो सकता है, पर सत्य पराजित नही हो सकता. गेल्या काही दिवसातला घटनाक्रम पाहिला तर महाराष्ट्रात चमत्कार घडलाय. सत्तेत एक वेगळी ताकद असते. प्रत्येकाची एक मनोकामना असते, कुणाची वैयक्तिक असते कुणाची जनतेसाठी असते. पहिल्यांदाच असं घडलंय की सत्तेत असलेली मंडळी विरोधकांकडे आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा