भाजपा खासदार मनोज कोटक यांनी उठवला होता लोकसभेत आवाज
मुंबई महानगरपालिकेतर्फे पवई तलावाच्या काठावर सायकल ट्रॅक बांधण्यात येत आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या सायकल ट्रॅक बांधकामावर बंदी घातली आहे. कारण आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांनी सायकल ट्रॅकच्या बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
भारतीय जनता पार्टीचे स्थानिक खासदार मनोज कोटक यांनीही लोकसभेत याविरोधात आवाज उठवला होता आणि केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांना पत्रही लिहिले होते. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयावर खासदार कोटक यांनी आनंद व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे बीएमसीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे सांगितले आहे.
यासह महापालिकेने तलावाच्या काठावर झालेली सर्व बांधकामे हटवून तलाव संकुल पूर्ववत करावे, असे सांगितले आहे. दरम्यान, पालिकेने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी न्यायालयाला आपल्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती केली. मात्र मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्हीजी बिश्त यांच्या खंडपीठाने महापालिकेची ही विनंती फेटाळून लावली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचे पीएचडी स्कॉलर ओंकार सुपेकर आणि अभिषेक त्रिपाठी यांनी या मुद्द्यावर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
हे ही वाचा:
… म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध
आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पंतप्रधान मोदींच्या नावाने पहिला रुद्राभिषेक
राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा
भाजपाचे स्थानिक खासदार मनोज कोटक यांनीही या प्रकरणाबाबत लोकसभेत आवाज उठवला होता. १२५ वर्षे जुन्या असलेल्या या तलावाला हेरिटेजचा दर्जा असल्याचे त्यांनी सांगितले होते. तलावाकाठी सायकल ट्रॅक तयार केल्यास जैवविविधतेला हानी पोहोचू शकते. कोटक यांनी याबाबत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्रही लिहिले होते.