आशिष शेलार यांच्या आग्रही मागणीनंतर अकृषी कराला स्थगिती

आशिष शेलार यांच्या आग्रही मागणीनंतर अकृषी कराला स्थगिती

मुंबई उपनगरातील रहिवाशांना बजावण्यात आलेल्या अकृषिक कराच्या नोटींसींना स्थगिती देण्यात आली असून कायम स्वरुपी या नियमात बदलण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल, असेही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले. ‍विधानसभेत आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी लक्षवेधी सुचना मांडून मुंबई उपनगरातील अकृषिक कराच्या नोटीस संदर्भात विषय मांडला.

मुंबई उपगरात राहणाऱ्या सुमारे ६० हजारांहून अधिक नागरीकांना शासनाकडून अकृषिक कराच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या नोटीस अन्यायकारक असून याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. ज्यावेळी उपगरामध्ये इमारती, चाळी व अन्य रहिवाशी बांधकामे करण्यात आली त्यावेळी प्रत्येक बांधकामाने अकृषिक कर भरला. त्यानंतर ही प्रत्येक वेळा त्यांना या कराच्या नोटीसा बजावल्या जातात.

विविध पातळीवर पाठपुरवा केल्यानंतरही पुन्हा पुन्हा अशा नोटीस बजावण्यात येतात. या खात्यातील अधिकारी असं का करतात? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तसेच वांद्रे पश्चिम येथील सारस्वत गृहनिमाण सोसायटी, सॅलसेट सोसायटी, सेंट सॅबेस्टीयन सोसायटी आदी मोठया सोसायट्यांना बजावण्यात आलेल्या नोटीस विधानसभेत सादर केल्या.

हे ही वाचा:

बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवून भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम

‘गली बॉय’ फेम रॅपर ​​धर्मेश परमारचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीचा गोरक्षकांनी केला पर्दाफाश

अशा प्रकारचा कर मुंबई शहरातील सोसायट्यांना भरावा लागत नसून केवळ उपनगरातील बांधकामांना आकारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे एकाच शहरात दोन नियम कसे? असा सवालही आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार यांच्या मागणीला सर्वपक्षीय आमदारांनी पाठींबा दिलाच तसेच भाजपाचे आमदार अतुल भातकळकर, योगेश सागर, ॲड पराग अळवणी, मनिषा चौधरी, विद्या ठाकूर, भारती लवेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या नोटीसांना तातडीने स्थगिती द्या अशी आग्रही भूमिका घेतली.

दरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर हे अकृषक कराबद्दल म्हणाले की, “या कराला तातडीने स्थगिती दिली पाहिजे. कोरोनामुळे आधीच लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा काळात लोक सावरत असताना हा जिझिया कर काही वर्षांचा परतावा घेण्याचा प्रयत्न चालला आहे, याला स्थगिती द्यावी.”

Exit mobile version