मोदी हटाओ, देश बचाओ असे लिहिलेले आम आदमी पार्टीचे पोस्टर्स हा सध्या दिल्लीत चर्चेचा विषय बनला आहे. आपने हे पोस्टर्स विविध ठिकाणी लावल्यानंतर आता १०० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सहा जणांना अटकही करण्यात आली आहे. पण आम आदमी पार्टीने असे पोस्टर्स लावण्यात वाईट काय आहे असा पवित्रा घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवा आणि देशाला वाचवा असा दावा करणारे पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आले. यासंदर्भात बोलताना विशेष पोलिस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी १०० एफआयआर दाखल केले आहेत. सहा जणांना यासंदर्भात अटक करण्यात आली आहे. या पोस्टर्सवर कोणत्याही प्रिंटिंग प्रेसचे नाव नाही. त्यामुळे प्रिंटिंग प्रेस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
रामदास कदम वाट कसली पाहताय, उडवून द्या बार!
खलिस्तान समर्थक अमृतपालने रंगरूप बदलून काढला पळ! नवी माहिती आली समोर
आव्हाड, भास्करराव वस्त्रोद्योग कार्यालयाचा एवढा धसका कशाला?
आनंद, समृद्धी घेऊन आला गुढीपाडवा!
पाठक यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी ऑफिसमधून बाहेर पडलेल्या एका कारला ताब्यात घेण्यात आले. त्यात काही पोस्टर्स सापडले. ते जप्त करण्यात आले असून काही लोकांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मोदीविरोधातील असे २००० पोस्टर्स पोलिसांनी जप्त केले आहेत.
टीव्ही ९ भारतवर्षने दिलेल्या बातमीनुसार असे ५० हजार पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आले आहेत. दोन प्रिंटिंग प्रेसला ही ऑर्डर देण्यात आली होती. ही सगळी पोस्टर्स संपूर्ण दिल्लीत लावण्यासाठी काही लोकांना काम सोपविण्यात आले होते. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत ही पोस्टर्स लावण्याचे काम देण्यात आले होते.
यासंदर्भात आम आदमी पार्टीने जंतर मंतर येथे निदर्शने केली आहेत. आणि मोदी हटाओ देश बचाओ असे लिहून जर पोस्टर्स लावण्यात आले असतील तर त्यात चूक काय आहे? असा सवालही आम आदमीचे नेते विचारत आहेत.