छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सत्ताधारी भाजपकडून याबाबत अजित पवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाबाबत कलेल्या ट्वीटमुळे ते देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता अशा आशयाचे ट्वीट जितेंद्र आव्हाडांनी केले होते. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून आव्हाडांवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच मुंबई येथील भांडूप परिसरात आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बॅनर लावल्याचे समोर आले आहे. भांडूपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बॅनर बाजी करून त्यावर, ‘मुंब्रा रक्षक जितुद्दीन खान असा’ उल्लेख करण्यात आला आहे.तसेच या बॅनरवर ‘मॉडर्न अफजल खान अर्थात जितुद्दीन खान याचं करायचं काय’ अशा अशयाचा मजकूरहि लिहिण्यात आला होता.
जितेंद्र आव्हाडांनीऔरंगजेबाबाबत एक ट्वीट केले होते, त्यात औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता असा उल्लेख त्यांनी केला होता त्यांच्या या ट्वीटवर राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेब ‘जी’ असा केला होता. त्यावर विरोधकांकडून सडकून टीका झाल्यानंतर त्यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली होती.
चंद्रशेखर बावनकुळेंनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, क्रूरकर्मा, पापी औरंग्याने छत्रपती श्री. संभाजी महाराज यांना हालहाल करून त्यांचे प्राण घेतले. औरंग्याने काशी विश्वेश्वराचे मंदीर फोडले. अशा नीच क्रूरकर्म्याला मी स्वप्नातही ‘जी’ म्हणू शकत नाही.बावनकुळे पुढे असेही म्हणाले की,आमच्या पक्षाची औरंग्याबाबतची भूमिका सर्वांना ठावूक आहे,औरंग्या राष्ट्रवादीचे श्रध्दास्थान आहे हे आव्हाडांनी अनेकदा सिध्द केलेले आहे.आम्हाला नसत्या शब्दांमध्ये अडकवून स्वतःला स्वच्छ असल्याचे दाखवू नका.औरंग्याचे आणि तुमचे नाते जगाला ठाऊक आहे, असेहि उत्तर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांना दिले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या भांडूप येथील बॅनरने आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
औरंगज़ेब तो पापी था !! pic.twitter.com/bSG5BESAWc
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) January 4, 2023
हे ही वाचा:
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
खिलाडी अक्षय कुमारने योगी आदिनाथांना दिले रामसेतु पाहण्याचे निमंत्रण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
श्रीनगरमधील अहमद अहंगर दहशतवादी घोषित
कुठे लावले होते बॅनर?
भांडूप पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याच्या दिशेने जाताना लावण्यात आलेल्या बॅनरवर जितेंद्र आव्हाड यांना डिवचणारा मजकूर या बॅनर्स वर होता. हे बॅनर्स नेमके कुणी लावले याबाबत काही माहिती समोर आली नसली तरी रात्री अंधाराचा फायदा घेत हे बॅनर्स लावण्यात आल्याचे कळते. पोलिसांनी दखल घेऊन हे बॅनर्स हटविले आहेत मात्र,या बॅनर्सची आता राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.