ठाण्याच्या एका पोस्टरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस असतो. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असे लिहिले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये एकनाथ शिंदेचे नाव टाकून भावी मुख्ममंत्री असे लिहिण्यात आले आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघात ते प्रचंड लोकप्रिय आहेत.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांचे नावही स्पर्धेत पुढे होते. आता चक्क त्यांच्या नावाखाली भावी मुख्यमंत्री असं लिहीत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा:
…आणि चीनने पाकिस्तानला एक दमडीही दिली नाही
कर्नाटकातील शाळांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा वाद
राज्यसभेत लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
‘सिद्धू यांच्या रक्तात पंजाब, हवे तर कापून बघा’
वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. दरम्यान, अजूनतरी यावर कोणतीही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली नाही.