31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणशासकीय, निमशासकीय कर्मचारी उद्यापासून कामावर राहणार हजर; संप मागे

शासकीय, निमशासकीय कर्मचारी उद्यापासून कामावर राहणार हजर; संप मागे

समिती स्थापन करून तीन महिन्यात अहवाल देण्याची माहिती

Google News Follow

Related

आज राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्याचे जाहीर केले असून त्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मागील सात दिवसांपासून चालू असलेला संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करून ती तीन महिन्यात अहवाल देईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही आडमुठी भूमिका न घेता आम्ही पावले उचलू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाखाली लागू करण्याविषयी सरकार सकारात्मक आहे, असे सरकारने म्हटल्यानंतर  संप मागे घेतल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात येत आहे. म्हणूनच आज हा संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातल्या सरकारी, निमसरकारी , शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी गेल्या एक आठवड्यापासून संप पुकारून केली होती. या संपाची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना पूर्वीच्याच प्रभावाने लागू करण्यात यावी यासाठी आता राज्यसरकार सकारात्मक असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे. सुकाणू समन्वय समितीने राज्यातील अवकाळीने जी कामे प्रलंबित राहिली आहेत, ती प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी यांनी उद्यापासून कामावर त्वरित हजार राहावे असे आव्हान करण्यात आले आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक असल्याचे समन्वय समितीकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

बागेश्वर बाबांच्या दरबारात मारला होता ४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ल्ला , ६ जण ताब्यात

ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स

पन्हाळगडावर चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात

‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी

या संघटनेचे नेते विश्वास काटकर यांनी सांगितले कि, आमची जुन्या पेन्शन योजनेची मुख्य मागणी होती. शासनाने यासंदर्भात वेळोवेळी कार्यवाही केली, त्यानंतर आज राज्य शासनाने स्पष्ट केले कि यासंदर्भात आम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहोत. त्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आम्ही भूमिका स्वीकारली असल्याचे काटकर त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आज माझ्या बरोबर सरकारी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली असून सकारात्मक सहकार्य करीत संप मागे घेण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो जुनी पेन्शन योजनेबाबत एक समिती गठीत करण्यात आली असून या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून यावरती योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.      

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा