राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आमनेसामने आले असून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली होती. त्यावरून विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपाकडून झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिवसेना संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केले होते.
या व्यंगचित्रावरून भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना फटकारलं असून आता संजय राऊत यांनी हे व्यंगचित्र असणारे ट्विटच डिलीट करून टाकले आहे. संबंधित ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एका खुर्चीवर बसल्याचे दिसून येत होते. तसेच त्यांचे पाय पुढच्या एका खुर्चीवर असून ते ‘हॅव्ह अ सीट’ असे बोलत असल्याचे वर लिहिण्यात आले होते. बाजूला एक लहान स्टूल होतं. समोर भाजप नेते प्रमोद महाजन हे उभे असल्याचे चित्रात दिसून येत होतं. त्या ट्विटमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट… असे लिहिले होते.
हे ही वाचा:
आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!
आनंद महिंद्र यांनी पाळले वचन; दिली नवी कोरी बोलेरो!
…म्हणून महाराष्ट्रातील चार मुलांना मिळाला राष्ट्रीय बाल पुरस्कार
ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक विजेत्यांनी गायले राष्ट्रगान
संजय राऊत यांच्या ट्विटला भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आणि खासदार पूनम महाजन यांनी चोख प्रत्युत्तर दिले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय प्रमोद महाजन या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, असा खोचक सल्ला पूनम महाजन यांनी संजय राऊत यांना दिला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी संबंधित ट्विटच डिलीट करून टाकले आहे.