पूजा चव्हाण प्रकरणात एक नवीन घडामोड समोर येत आहे. पूजा चव्हाणच्या चुलत आजीने पूजा चव्हाण हत्त्या प्रकरणात (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे.
७ फेब्रुवारीला पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. पुजा चव्हाण असे या तरुणीचे नाव होते. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी तिच्या भावाबरोबर रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली.
मुळची परळीची असलेली २२ वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकायला आली होती. तिच्या भावाबरोबर ती पुण्यात हडपसरमध्ये राहात होती. रविवारी मध्यरात्री १ च्या आसपास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली.
हे ही वाचा:
भाजपाचे आमदार अतूल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार या मंत्र्याला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडेंना अशाच प्रकारे महिलेशी संबंध ठेवल्याप्रकरणी ठाकरे सरकारने पाठीशी घातले होते याची आठवणही त्यांनी करून दिली.
ठाकरे सरकारच्या मंत्र्यांपासून राज्यातील महिला असुरक्षित. रक्षकच बनले भक्षक. pic.twitter.com/HT4eEjtnQq
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 11, 2021
महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप संजय राठोडची चौकशीही केलेली नाही. त्यामुळे पूजा चव्हाण यांच्या चुलत आजीने केलेल्या या मागणीला अजूनच महत्व प्राप्त झाले आहे.