24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारणमुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलखोल अभियान

मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पोलखोल अभियान

Google News Follow

Related

महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीखोरीची व गेल्या २५ वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ (पत्रा चाळ असलेला वॉर्ड) मध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई भाजपाच्या वतीने पोलखोल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,महापालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रभारी/आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाल शेट्टी, खासदार पुनमताई महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार अमित साटम, स्थानिक आमदार विद्या ठाकुर व मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ही सभा सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११,प्रबोधन क्रीडाभवनाजवळ,तातू हॉटेलच्या बाजूला, गोरेगाव (प) येथे होणार आहे.

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून भाजपाने सातत्याने टीकास्त्र सोडले आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा आणि सुरक्षाव्यवस्था, गुन्हेगारी, महिलांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचीही पोलखोल गेली अनेक वर्षे भाजपाकडून केली जात आहे. नालेसफाई, आरोग्य, पाण्याचा प्रश्न, रस्ते, कचरा, अनधिकृत बांधकामे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाजपाने मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी केलेली आहे. याच विषयांना पुन्हा वाचा फोडण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मंदिरात इफ्तार, एकतर्फी सर्वधर्म समभावाचे चाटण

आम्ही ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत नाही, जनतेचा कौल स्वीकारतो

माटुंगा येथील रेल्वे अपघाताचे कारण आले समोर

मशिदीवरील भोग्यांसंबंधी मनसेला इशारा देणाऱ्या PFI नेत्यावर गुन्हा

 

या सभेचे निमंत्रक असतील संतोष मेढेकर, जिल्हाध्यक्ष, उत्तर पश्चिम जिल्हा, संदीप पटेल, नगरसेवक, विजय गायकवाड,
अध्यक्ष,गोरेगाव भाजपा आणि सुनिल चव्हाण, वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्र.५८.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा