शिवसेनेनेच्या भ्रष्टाचाराची नाळ जिथे पुरली आहे. जिथून मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्यात आलं, त्या पत्राचाळीतून मुंबई भाजपाने आज पोलखोल अभियानाचा बिगुल फुंकला. मुंबई भाजपाचे प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीपासून हे अभियान सुरू झाले आहे.
पत्राचाळीतील घोटाळा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बाहेर काढत शिवसेनेला जेरीस आणले आहे. संजय राऊत यांचा या घोटाळ्यात मुख्य भूमिका होती, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. याच पत्राचाळीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची संपत्तीही जप्त करण्यात आली. त्याच पत्राचाळीच्या भागातून भाजपाने पालिकेतील भ्रष्टाचार आणि महाविकास आघाडीच्या वसुलीकांडाची पोलखोल करण्यासाठी अभियान सुरू केले आहे.
हे ही वाचा:
पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी
‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’
शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
या सभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,महापालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रभारी/आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाल शेट्टी, खासदार पुनमताई महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार अमित साटम, स्थानिक आमदार विद्या ठाकुर व मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.