अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा त्याबाबत विविध प्रकारच्या राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २२ जानेवारी २०२४ च्या कार्यक्रमात विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या सहभागावर भाष्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “विरोधकांनी अयोध्येला गेल्याने अथवा न गेल्याने काही फरक पडणार नाही, विरोधकांच्या न येण्याने अयोध्येतील काही सौंदर्य कमी होणार नाही.”
अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरातील भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील आठ हजार नामांकित व्यक्तींना निमंत्रण देण्यात येणार आहेत, तसेच विरोधी पक्षांच्या प्रमुखांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेत्यांना निमंत्रण मिळूनही अयोध्या सोहळ्यास न जाण्याचे ठरवले आहे. यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
हे ही वाचा:
रशियाने युक्रेनवर १२२ क्षेपणास्रं डागली; ३१ नागरिक ठार
अभिषेक सोहळ्यापूर्वी राम मंदिराच्या प्रतिकृतीची प्रचंड विक्री!
अयोध्येत महर्षि वाल्मिकी विमानतळ, प्रभू रामचंद्रांच्या आगमनाचे चित्र!
कर्नाटक: एकाच कुटुंबातील पाच जणांचे घरात सापडले सांगाडे!
हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, “अयोध्या सोहळ्यासाठी भारतीय लोक उत्साहित आहेत.आम्ही निमंत्रण देण्यास उत्सुक आहोत. मात्र, ज्यांना निमंत्रण मिळले आहे त्यांना यातही राजकारण दिसत आहे. निमंत्रण मिळूनही विरोधी पक्षनेते काय विचार करत आहेत, हे मला माहीत नाही. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी अयोध्येला जायला हवे. पण त्यांना बाबरच्या लोकांची भीती वाटते. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते राम मंदिर पाहायला जाणार नाहीत. हिंदूंचा दबाव वाढेल तेव्हाच हे जातील,” असे सरमा म्हणाले.