अमरावती जिल्ह्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या घटनेवर चांगलाच वाद पेटला आहे. अमरावती मधील अपक्ष आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला होता. पण हा पुतळा कोणतीही परवानगी न घेता बसवण्यात आल्या. त्यामुळे त्यावर कारवाई करून हा पुतळा काढण्यात आला. या घटनेवरून आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत सिंह राणा ते दोघेही चांगलेच आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यासाठी आम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही असे राणा दाम्पत्याचे म्हणणे आहे.
रविवार, १६ जानेवारी रोजी हा पुतळा हटवण्याच्या घटनेवरून अमरावती जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. राणा यांच्या घराबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमीली असून त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन छेडले. तर यावेळी जिल्ह्याचे पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून त्यांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सर्व शिवप्रेमींचा संताप दिसून आला. उद्धव ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा सर्वत्र घुमताना दिसल्या. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरही ही घोषणाबाजी थांबली नव्हती.
हे ही वाचा:
दिल्लीत गेल्या दोन वर्षातील सर्वाधिक हुडहुडी भरविणारा दिवस
संगीतद्वेष्ट्या तालिबान्यांनी भरचौकात जाळली वाद्ये!
किरण माने करायचा महिला सहकलाकारांसोबत गैर वर्तणूक
भारतीय लष्कराच्या लढाऊ गणवेशाची पहिली झलक
यावेळी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. जिल्ह्यातील शिवभक्त परवानगी मागून थकले पण त्यांना परवानगी मिळाली नाही. पण महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी कोणाची परवानगी हवीच कशाला? असा सवाल त्यांनी विचारला तर छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या जनतेने तीन वर्षे परवानगी मागूनही ती न मिळाल्याने अखेर आम्ही हा पुतळा बसवण्याचे पाऊल उचलले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मत मागितले पण आता तेच छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवतात असे टीकास्त्र त्यांनी यावेळी सोडले.