या निर्णयासाठी ठाकरे सरकार जबाबदार- पाटिल
मराठा समाजाने संयम बाळगावा- शिवाजीराजे छत्रपती
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणावरून मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे खासदार शिवाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी मराठा आरक्षण रद्द होण्यासाठी ठाकरे सरकारला जबाबदार ठरले आहे. हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री निवास वर्षा बंगल्यावर बैठक घेण्यात आली.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले
‘कू’ हे स्वतःच्या घरासारखे, तर बाकी सारे भाड्याचे- कंगना रनौत
ठाकरे सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळेच हा दुर्दैवी निर्णय
…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील
बुधवारी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे सरकार याला घाबरले आहे. संभाजी राजांनी देखील याबाबत हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले, त्याशिवाय मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन देखील केले आहे. ते हे देखील म्हणाले की, यापूर्वीच्या आणि या दोन्ही सरकारांनी आरक्षण मिळावे यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने निकाल याच्या विरूद्ध आला आहे. ते म्हणाले की सध्या कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरून कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.
मराठा आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकार जबाबदार- चंद्रकांत पाटिल
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी मराठा आरक्षण रद्द होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांनी आरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयातील ही लढाई आम्ही जिंकलो होतो, परंतु या सरकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.