दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली

राहुल गांधींनी दिल्लीतील प्रदूषण, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केजरीवालांवर उठवली टीकेची झोड!

दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर प्रचारकामांना वेग आला आहे. दिल्लीत आप, भाजपा आणि काँग्रेस अशा तीन प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत लढणार आहे. ‘इंडी’ आघाडीमधील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि आप दिल्लीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकरे आहेत. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करण्याची संधी सोडत नसून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत पहिली सभा घेतली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपापेक्षा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जोरदार निशाणा साधला. खोटी आश्वासने देण्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना सुनावले. यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवर राहुल गांधी यांना सुनावले. त्यांनी म्हटले की, “राहुल गांधी दिल्लीत आले आणि त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. पण, मी यावर काहीही बोलणार नसून त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे आणि माझी लढाई देशाला वाचवण्यासाठी.”

ईशान्य दिल्लीतील सीलमपूर येथे एका सभेला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी म्हटले की, जातीय जनगणनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोघांकडूनही एक शब्दही ऐकला नाही. पुढे ते म्हणाले की, तुम्ही केजरीवाल यांना विचारा की त्यांना मागासवर्गीयांसाठी आरक्षण हवे आहे का. मी जेव्हा जातीच्या जनगणनेबद्दल बोलतो तेव्हा मला दोघांकडून एकही शब्द ऐकू येत नाही. खोटी आश्वासने देतात, असं म्हणत राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

गौतम अदानी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणावर अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगल्यावरून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. अरविंद केजरीवाल कधी अदानी यांच्याबद्दल बोलले आहेत का? असा सवाल राहुल गांधींनी विचारला. तसेच राजधानीचे पॅरिसमध्ये रूपांतर करण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. पण, त्याऐवजी भ्रष्टाचार, प्रदूषण आणि महागाई वाढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. सत्तेवर असताना केजरीवाल म्हणाले होते की, स्वच्छ दिल्ली बनवू. पण आता प्रदूषण खूप झाले आहे. महागाई आणि भ्रष्टाचार गगनाला भिडला आहे. आम्ही सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार दूर करू, असं राहुल गांधी म्हणाले.

हे ही वाचा : 

महाकुंभ मेळाव्यात सहभागी होता येणं हे भाग्यचं!

ऑनर किलिंग रोखण्यासाठी ‘सुरक्षागृह’ निर्णयाची अंमलबजावणी करावी

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार

भव्य हिंदू आध्यात्मिक एवं सेवा मेळाव्याला भाविकांचा भरघोस प्रतिसाद!

दुसरीकडे तृणमूल काँग्रेस, ठाकरे गट आणि समाजवादी पक्ष यांसारख्या प्रमुख इंडी आघाडीमधील पक्षांनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला पाठिंबा दिला असून दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र आहे. राहुल गांधी यांनी टीकेची तोफ डागल्यानंतर प्रत्युत्तरात अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, “आज राहुल गांधी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिवीगाळ केली. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांचा लढा काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे आणि माझा लढा देश वाचवण्यासाठी आहे.” दिल्लीत ५ फेब्रुवारीला सर्व ७० विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर, ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील.

Exit mobile version