उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटला आहे. टिहरी विधानसभेच्या जागेवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस पक्षाने एकदिवस आधी माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय यांना पक्षविरोधी कारवायांसाठी त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. डेहराडून येथे निवडणूक प्रभारी प्रल्हाद जोशी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या उपस्थितीत किशोरयांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
किशोर टिहरीमधून निवडणूक लढवणार…
१४ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानासाठी भाजपने किशोर उपाध्याय यांना टिहरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी भाजपला राज्यातील डोईवाला जागेवरच आपला उमेदवार घोषित करायचा आहे. टिहरीचे विद्यमान भाजप आमदार डॉ.धन सिंह नेगी हे देखील आज काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. नेगी हे टेहरीहून डेहराडूनला समर्थकांसह रवाना झाले आहेत. काँग्रेस धनसिंग नेगी यांना टिहरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार घोषित करू शकते.
हे ही वाचा:
समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन
गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..
आता कारने उडत उडत प्रवास करता येणार!
राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे
उपाध्याय यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, त्यांना सर्व पक्षीय पदांवरून निलंबन मागे घ्यायचे होते. याबाबत त्यांनी पक्षनेतृत्वाला माहिती दिली. त्यानंतर शिस्तभंगाच्या कारवाईचे कारण देत त्यांना नुकतीच सर्वपक्षीय पदांवरून हटवण्यात आले आणि मग त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये तिकीट बदलाबाबतही पक्षात घराणेशाही असल्याची चर्चा रंगली आहे. हरीश रावत, हरकसिंग रावत, यशपाल आर्य, कै. इंदिरा हृदयेश रादेश आणि संसद सदस्य केसी सिंह बाबा यांच्या कुटुंबीयांना तिकीट मिळाले आहे. हरक यांची सून अनुकृती यांना लॅन्सडाउनमधून, माजी खासदार केसी सिंग बाबांचा मुलगा काशीपूरमधून, इंदिरा यांचा मुलगा सुमित हृदयेश हल्द्वानीमधून आणि हरीश रावत यांची मुलगी अनुपमा यांना हरिद्वार ग्रामीणमधून उमेदवारी देण्यात आली आहे.