31 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारणगोव्यात ४० जागांसाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी लावला जोर

गोव्यात ४० जागांसाठी भाजप, काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी लावला जोर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश, मणिपूर , पंजाब, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मात्र बाकीच्या चार राज्यांपेक्षा गोवा विधानसभा निवडणूक या वर्षी जास्त चर्चेत राहिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

गोव्यातील विधानसभेची सदस्य संख्या ४० इतकी आहे. राज्यात उद्या एका टप्प्यात ४० जागांवर मतदान होणार आहे. यापूर्वी गोव्यात काँग्रेस आणि भाजपामध्ये लढत व्हायची. मात्र यावर्षी या लढाईत तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी उतरले आहेत. गेल्या दहावर्षांपासून गोव्यात भाजपाचे सरकार असून यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

४० जागांसाठी गोव्यात ३०१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांच्यात लढत सुरु आहे. तिथे प्रचारासाठी आतापर्यन्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली होती. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे उद्या होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

‘मला तुमच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिलेली नाही’

चक्क ‘पुष्पा’ मुळे पकडले गेले चोर….

…. म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने दिली टेबल टेनिस फेडरेशनच्या कामकाजाला स्थगिती

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पणजी विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून उमेदवारीने मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपकडून बाबुश मोन्सेरात यांना उमदेवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात इतर ९ काँग्रेस आमदारांसह भाजपमध्ये सहभागी झाले होते. तिथे आता बाबुश मोन्सेरात विरुद्ध उत्पल पर्रिकर यांच्यात लढत होणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हा काँग्रेस होता. मात्र, भाजपने छोट्या छोट्या राजकीय पक्षांच्या साथीने सरकार बनवले होते. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसने यावेळी उमदेवारांना शपथ दिली होती त्याशिवाय उमदेवारांकडून पक्ष सोडणार नसल्याचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले होते. यावेळी राहुल गांधी यांनी गोव्यात प्रचार केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा