25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारण'मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतात राजकीय कुरघोडी'

‘मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी भारतात राजकीय कुरघोडी’

Google News Follow

Related

सध्या भारत देश हा एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक राजकीय कुरघोडी आखण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र अतिशय वेगळे आहे. मात्र यामागे केवळ मोदी सरकारची बदनामी करणे हाच  हेतू असल्याचे परखड मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केले. अमेरिकेमध्ये त्यांनी हे विधान केलेले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल एचआर मॅकमास्टर यांच्याशी हूवर इन्स्टिट्यूटने सादर केलेल्या ‘भारत: संधी आणि रणनीतिक भागीदारीसाठी आव्हान’ या विषयावरील सत्रात झालेल्या संभाषणात जयशंकर यांनी असेही म्हटले की, भारत सध्या अत्यंत तणावाच्या काळातून जात आहे. (कोविड-१९) सर्व देशभर पसरलेला आहे. “आम्ही जवळपास ८०० दशलक्ष लोकांना मोफत भोजन देत आहोत. तसेच सरकारने ४०० दशलक्ष लोकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले आहेत. याविषयावर अधिक बोलताना परराष्ट्रमंत्री म्हणाले, ज्यावेळी भारताची तुलना परदेशाशी होते. त्यावेळी भारताची लोकसंख्या हा मुद्दाही विचारात घ्यायलाच हवा. भारताची एकूण लोकसंख्या पाहता भारतीयांना सरकारकडून नक्कीच चांगल्या सवलती देऊ केल्या जात आहेत. भेदभावाचा कोणताही प्रकार सरकारकडून होत नसल्याने, या सरकारचा मंत्री असल्याचा अभिमान असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

महिना लोटला, पालिकेच्या स्वप्नातील ऑक्सिजन प्रकल्प गेले कुठे?

राजे, तुम्हाला मराठा आरक्षणाचा ठेका दिलेला नाही

नेते, सेलिब्रिटींकडे वाटण्यासाठी औषध कसं आणि कुठून येतं?- उच्च न्यायालय

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

या विषयावर अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, तुम्ही जेव्हा शासनाच्या निर्णयावर खरे ठरता किंवा यशस्वी होता. त्यावेळी सरकारची राजकीय अशी एक प्रतिमा तयार होते. अनेकदा विरोधक ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही करतात. त्यामुळे जे चांगले आहे ते घेऊन आपण पुढे जायचे असेही ते म्हणाले.

विद्यमान सरकारने अनेक मार्गांनी भारतीयांचे मन जिंकले आहे. त्यामुळे भारतीयांना लोकशाहीबद्दल पूर्ण विश्वास आहे. भारतामध्ये म्हणूनच सर्व जाती धर्माचे लोक आजही एकत्र नांदताहेत.

जयशंकर मॅकमास्टरच्या “हिंदुत्ववादी धोरणे” या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, भारतीय लोकशाहीचे धर्मनिरपेक्ष तत्व बिघडावे म्हणून अनेकजण कार्यरत असतात. पण यामध्ये प्रत्येकाला यश येईलच असे नाही. सध्या आपण जे भारतात पाहतोय, ते लोकशाहीचे सखोलीकरण आहे. राजकारणात आणि नेतृत्वपदावर आणि नागरी समाजातील व्यापक प्रतिनिधित्व आहे करणारे मोदी सरकार आहे.

जयशंकर बुधवारी वॉशिंग्टनला गेले असून, तेथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. जानेवारीत राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या वरिष्ठ भारतीय मंत्र्यांची ही पहिली भेट असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा