अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले

अखेर इम्रान खान क्लिन बोल्ड; पंतप्रधानपद गमावले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची अखेर गच्छंती झाली. १० एप्रिलच्या मध्यरात्री १.२१ वाजता हे स्पष्ट झाले की, इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाला. १७४ मतांनी हा ठराव मंजूर झाला. पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधानाला विश्वास ठरावाद्वारे पायउतार व्हावे लागले. इम्रान खान यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. शेहबाज शरीफ हे आता नवे पंतप्रधान होतील अशी चिन्हे आहेत.

३४२ सदस्यांच्या संसदेत १७४ मते ही अविश्वास ठरावाच्या बाजूने पडली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना हटविण्यासाठी १७२ मतांची गरज होती. त्यापेक्षा २ मते जास्त पडली.

हा  ठराव मांडण्यात आला तेव्हा पाकिस्तान संसदेच्या बाहेर इम्रान खान यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. इम्रान खान यांनी बहुमत गमावल्यानंतर पाकिस्तानच्या ऍटर्नी जनरलनी राजीनामा सोपविला. पाकिस्तानचे विरोध पक्षनेते शरीफ यांनी जाहीर केले की, नवी आघाडी पाकिस्तानच्या उभारणीसाठी सज्ज आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले शेहबाज शरीफ यांनी सांगितले की, आम्ही कोणताही सूड उगवणार नाही किंवा कुणालाही तुरुंगात टाकणार नाही. पण कायदा आपले काम करील.

हे ही वाचा:

नितीन गडकरी यांच्यानंतर, रावसाहेब दानवे गेले राज ठाकरेंच्या भेटीला

पृथ्वीराजच्या रूपात कोल्हापूरला मिळाली २१ वर्षांनी महाराष्ट्र केसरीची गदा

ठाण्यात रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक

भारतीय केळी, बेबीकॉर्नची कॅनडा वारी

 

सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान इम्रान खान यांच्यापुढे ठेवले होते, पण त्यात इम्रान यांना अपयश आले. आता इम्रान खान देश सोडून जाऊ शकत नाहीत. आता पाकिस्तानमध्ये हायअलर्ट देण्यात आला आहे. इस्लामाबादमधील सर्व रुग्णालये देखील हाय अलर्टवर आहेत. पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version