हिंसक आंदोलकांना पोलिसांनी घेरले

हिंसक आंदोलकांना पोलिसांनी घेरले

दिल्लीच्या सीमांवर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी जमिनीवर खिळे रोवले आहेत. अनेक बॅरीकेड्सच्या साखळ्या देखील सीमेवर तैनात केलेल्या आहेत. पोलिसांच्या लोखंडी बॅरीकेड्सशिवाय सिमेंटचे बॅरिकेड्सदेखील ठेवण्यात आले आहेत.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु आहे. आंदोलक हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. सरकारने लोकशाही मार्गाने संसदेत संमत केलेले तीनही कृषी सुधारणा कायदे सरकारने मागे घ्यावेत सरकार आणि शेतकरी नेते यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. यानंतर सरकारने तोडगा काढण्यासाठी नरम भूमिका घेत तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षांसाठी तात्पुरती थांबवण्याचाही प्रस्ताव मांडला. परंतु आंदोलक तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत.

२६ जानेवारी २०२१ रोजी आंदोलक दिल्लीत शिरले. आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. परंतु आंदोलकांनी दिल्लीच्या रस्त्यांवर हिंसाचार सुरु केला. हिंसाचारामध्ये ४०० पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी खालिस्तानचा झेंडा फडकावला. प्रजासत्ताक दिनीच घडलेला हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतल्याचे दिसते आहे.

दिल्लीच्या गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Exit mobile version