करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन

करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन

करुणा शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाता बीड पोलिसांचं एक पथक करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी दाखल झालं आहे. सकाळी हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीनं पुढील तपास करण्यात येत आहे. बीड पोलिसांकडून करुणा शर्मा यांच्या घरात सर्च ऑपरेशन केलं जात आहे. करुणा शर्मा या रविवारी परळीमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक पिस्तूल आढळून आलं होतं.

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल आढळल्यानंतर त्यांच्या गाडीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर करुणा शर्मा यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शर्मा यांना अंबाजोगाई कोर्टानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. त्यानंतर आज बीड पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. करुणा शर्मा यांच्या मुंबईतील निवासस्थानी बीड पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. आता शर्मा यांच्या घरातून पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यता आलं.

हे ही वाचा:

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

‘सेलमोन भोई’वर कोर्टाने आणली बंदी

परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला का दिले ५ लाख रुपये?

शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?

दरम्यान, करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शर्मा यांची गाडी बाजारात आल्याचं दिसत आहे. गाडीभोवती गर्दी झाल्याने ही गाडी काही थोडावेळ बाजारात थांबली. त्याच संधीचा फायदा घेत एका व्यक्तीने शर्मा यांच्या कारची डिक्की उघडली. तर पिवळी ओढणी परिधान केलेली महिला कारमध्ये काही तरी ठेवताना दिसत आहे. त्यानंतर ही गाडी पुढे निघून गेल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

Exit mobile version