रझा अकादमीच्या कार्यालयावरील छाप्यातून मिळाले काही महत्त्वाचे कागद

रझा अकादमीच्या कार्यालयावरील छाप्यातून मिळाले काही महत्त्वाचे कागद

त्रिपुरा येथील कथित घटनेनंतर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारला. मालेगावमधील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर केवळ गुन्हा दखल केला होता. मात्र, आता रझा अकादमीच्या कार्यालयावर छापा टाकून कारवाई करण्यात आली.

रझा अकादमीच्या मालेगावमधील कार्यालयावर पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून काही कागदपत्रे आणि महत्त्वाची दस्तऐवज जप्त केले. पोलिसांनी सुमारे दोन तास कार्यालयाची झाडाझडती घेतली. मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, अशी माहिती समोर आली आहे. नगरसेवक अयाज हलचल याने एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचल याला बेड्या ठोकल्या असून, इतर ४२ जणांवर कारवाई केली आहे, तर दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

हे ही वाचा:

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकाला दीड कोटी मिळतच नव्हते

पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत

… तर २४ तासात एसटी कर्मचाऱ्यांना कामातून कमी करणार

ठाण्यानंतर भाईंदरमध्ये फेरीवाले आले अंगावर धावून

त्रिपुरा येथील कथित घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उमटले होते. हिंसाचारानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. त्यांच्यावर बंदी घाला असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती, नागपूर, सांगली पाठोपाठच आता औरंगाबाद, चंद्रपूर, साताऱ्यामध्येही जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेच्या अफवेनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले होते. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ अशा घटना घडल्या.

Exit mobile version