राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी  

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता राज ठाकरे यांची ही सभा पार पडणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. प्रशासनाने अद्याप या सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे पोलिसांनी पुढील १३ दिवसांसाठी औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

राज ठाकरे यांची सभा ठरल्याप्रमाणे होणार यावर मनसे नेते ठाम आहेत. मात्र, सणवार तसंच विविध आंदोलनांची कारणं देत पोलिसांनी औरंगाबादमध्ये ९ मेपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रसिद्ध केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना सभेसाठी परवानगी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिनी अनेक पक्षांच्या सभा होत असतात आणि जर त्यांना परवानगी दिली जात असेल तर आम्हालाही परवानगी द्यावी लागेल, असेही ते म्हणाले. तसेच पोलिसांकडे मैदानासाठी संबंधित अर्ज दिला असून दोन दिवसात त्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार

भारताविरोधी प्रसार करणारे १६ युट्यूब चॅनल्स ब्लॉक

एलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक!

राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन

दरम्यान, मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच केला असून चलो संभाजीनगर अशी घोषणा देण्यात आली आहे तसेच राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.

Exit mobile version