मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये

मनसे आंदोलनामुळे पोलीस ऍक्शन मोडमध्ये

मिशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, ४ मे रोजीचे अल्टिमेटम देत राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यासाठी पोलिसांची बैठक झाली आहे.

आज, ३ मे रोजी राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज शिवतीर्थावर बैठक बोलावली होती. याआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांना १४९ नुसार नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तत्काळ पोलीस महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यामुळे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

राज्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाला सूचना देण्यात आल्या आहेत की, कुठल्या परिस्थितीत कायदा सुव्यवस्था बिघडली जाऊ नये. त्याशिवाय समाज कंटका विरोधात कायदेशीर पाऊल उचलले गेले आहेत. राज्यात ८७ एसआरपीएफच्या कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यात ३० हजाराहून अधिक होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जनतेने पोलिसांना सहकार्य करावे, असे महासंचालक रजनीश सेठ म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा

जोधपूरमध्ये झेंड्यावरून दोन गटांत राडा

‘अ‍ॅमेझॉन’वर गुन्हा; औषधांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री

‘राऊतांचा लेख म्हणजे आंब्याच्या झाडाला, काकडी किती लागल्यात मोजण्यासारखे’

पुढे महासंचालक म्हणाले, राज्यातील १५ हजारांहून अधिक समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १३ हजार ५४ जणांना १४९ ची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस खबरदारी म्हणून बजावण्यात आल्याचे सेठ यांनी सांगितले आहे.

Exit mobile version