संजय पवार यांच्यासह आंदाेलक शिवसैनिक पाेलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री काेल्हापूरमध्ये पाेहचण्याच्या आधीच संजय पवार आणि शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करत हाेते. त्याचवेळी पाेलिसांनी निदर्शने माेडून आंदाेलक शिवसैनिकांची धरपकड सुरू केली.

संजय पवार यांच्यासह आंदाेलक शिवसैनिक पाेलिसांच्या ताब्यात

काेल्हापूरमधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या काेल्हापूर व सांगली दाैऱ्यावर आहे. मुख्यमंत्री काेल्हापूरमध्ये पाेहचण्याच्या आधीच संजय पवार आणि शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करत हाेते. त्याचवेळी पाेलिसांनी निदर्शने माेडून आंदाेलक शिवसैनिकांची धरपकड सुरू केली.

पाेलिसांनी संजय पवार यांना आंदाेलनाची भूमिका घेऊ नका, पाेलिस स्टेशनला चला असे सांगितले. परंतु संजय पवार यांनी आम्ही लाेकशाही मार्गाने आंदाेलन करणार हाेताे असे सांगत आपली भूमिका कायम ठेवली. त्यानंतर पाेलिसांनी संजय पवार यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गाडीत बसवले. त्यानंतर शिवसैनिकांनी पाेलिसांच्या गाडीसमाेरच ठिय्या आंदाेलन सुरू केले. त्यानंतर मग मात्र पाेलिसांनी बळाचा वापर करून आंदाेलक शिवसैनिकांना तेथून बाजूला केले.

हे ही वाचा:

समीर वानखेडेंना जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडून क्लीनचीट

उमेश कोल्हे हत्या प्रकरणी NIA कडून दहाव्या आरोपीला अटक

एकनाथ शिंदेंचे ‘शिवसेनाभवन’ दादरमध्येच

कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

बलात्कारासारखा आराेप असलेल्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार हाेताे. आम्ही लाेकशाही मार्गाने आंदाेलन करत असताना विराेध कशासाठी. राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. लाेकशाहीची हत्या हाेत आहे. आराेप शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला. युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाप्रमुख मंजित माने व युवासेना उपशहर प्रमुख वैभव जाधव यांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला विराेध

गेल्या काही दिवसांपासून काेल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काेल्हापूर आणि सांगलीमध्ये अनेक ठिकाणी पूर आले आहेत. राज्य सरकारने राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याचीही घाेषणा केली आहे. त्यामुळे या भागातील पूर आलेल्या भागांना भेट देऊन तेथील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी काेल्हापूर व सांगलीच्या दाैऱ्यावर आले आहेत. या दाैऱ्याला शिवसैनिकांनी जाेरदार विराेध केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाैऱ्यात निदर्शने करण्याची तयारी शिवसैनिकांनी केली हाेती.

Exit mobile version