रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या विरोधात पोलीस तक्रार

बुधवार २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे तसेच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाच्या संदर्भातील आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या कृतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. जयश्री पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तर ॲड. जयश्री पाटील यांनी लोकयुक्तांकडे सुद्धा या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी ध्वज संहितेचा भंग केल्याचे ॲड. पाटील यांचा दावा आहे. त्यामुळेच रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

समाजसेवक आणि साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

गतवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही डिजिटल बजेट..

उत्तराखंडमध्ये राजकीय उलथापालथ…

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीने रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनीही आचारसंहितेचा भंग केल्याचे पाटील यांचे म्हणणे असून त्यांनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात तक्रार केली आहे.

Exit mobile version