27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात पोलिस तक्रार! रश्मी ठाकरे, संजय राऊतांचेही नाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें विरोधात पोलिस तक्रार! रश्मी ठाकरे, संजय राऊतांचेही नाव

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक तेढ पसरवल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. या तक्रारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच दैनिक सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्याही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी कांदिवली येथील समता नगर पोलिस स्थानकात ही तक्रार नोंदवली गेली आहे.

सोमवार, १३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणात बोलताना बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेवण्याविषयी भाष्य केले. हे नागरिक कुठून येतात आणि कुठे जातात याची नोंद केली जावी असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यातून अशी प्रतिमा तयार झाली आहे की परराज्यातून नागरिक महाराष्ट्रात येतात आणि असले घृणास्पद गुन्हे करतात. मुख्यमंत्र्यांचे हे विधान हेच भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ) अन्वये गुन्हा असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री महोदय…आधी मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांवर कारवाई करा

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन

रक्षकच बनला भक्षक! पोलिसाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

ज्योती देवरेंच्या बदलीवरून चित्रा वाघ आक्रमक

मुख्यमंत्र्यांचे हे आक्षेपार्ह विधान मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर हँडलवर लिहिले गेले आहे. तर दैनिक सामना या वृत्तपत्राचा पहिल्या पानावरील मथळा म्हणूनही हेच वाक्य वापरण्यात आले आहे. खरं तर ते वाक्य मथळा म्हणून देण्याची काहीच गरज नव्हती. ही बातमी अतिशय चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे आहे आणि म्हणूनच रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांचे देखील नाव नमुद करत असल्याचे भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तर “मंत्रिमंडळात आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे धनंजय मुंडे, आपल्या पक्षाचे नेते संजय राठोड हे परप्रांतीय आहेत का?” असा सवालही अतुल भातखळकर यांनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा