पोलीसांना पश्चिम बंगालच्या भातपारा विभागाच्या मद्राल जयचंडिताला भागातून बाँब, बाँब बनवण्याचे साहित्य, गन पावडर आणि काही बंदुकांच्या गोळ्या शनिवारी जप्त केल्या आहेत.
पोलीसांनी स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून तपासकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘अशोक’ समजून ज्याच्याशी लग्न केले तो निघाला ‘अफजल खान’
भारतात येऊ शकतात पाच नव्या लसी
रेमडेसिवीरवरून अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा
निवडणुक आयोगाने देखील मतदानादरम्यान कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी अधिक सावधानता बाळगायला सुरूवात केली आहे. उत्तर २४ परगण्यातील भातपारा येथे सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान २२ एप्रिल रोजी होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या वेळेला हिंसाचाराचा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात ठेवून निवडणुक आयोगाने आठ टप्प्यात निवडणुक घेण्याचे ठरवले आहे.
पश्चिम बंगालमध्ये राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. विधानसभेच्या २९४ जागांसाठी आठ टप्प्यांत हे मतदान होणार आहे. बंगालमधल्या मतदानला २७ मार्चपासून सुरूवात झाली. या निवडणुकीचा शेवटचा टप्पा २९ एप्रिल रोजी पार पडणार आहे. मत मोजणी २ मे रोजी होणार आहे.
पश्चिम बंगाल बरोबरच आसाम, केरळ, तमिळनाडू या राज्यांत आणि पुदुच्चेरी या एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुका पार पडल्या. या सर्व निवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी होणार आहे.