31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणअजित पवारांचा अडवला ताफा; आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार

अजित पवारांचा अडवला ताफा; आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार

Google News Follow

Related

बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थितीत नियंत्रणात आहे.

कोरोना संकटाच्या काळात आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक दिली. मात्र  तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच आम्हाला नोकरीवरुन काढल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बीडमध्ये मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. मागच्या तीन ते चार दिवसांपासून रोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. काल जिल्हाभरात तब्बल सव्वा दोनशे कोरोना रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आणि राजेश टोपे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेऊन ते उस्मानाबादकडे निघाले असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी हे अजित पवार यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अचानक आंदोलक गाडी समोर आले.

हे ही वाचा :

एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार

येडियुरप्पा- जयंत पाटील का भेटत आहेत?

भारत न्यूझीलंड कसोटी जगज्जेतेपदाचा अंतिम सामना आजपासून रंगणार

कोरोना आकडेवारीत पुन्हा घट

अचानक गाडी समोर आलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली यावेळी आंदोलकांना गाडीच्या बाजूला हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. कशासाठी दौरे करत आहेत हे मंत्री. कोरोना करीता दीलेला बक्कळ निधी हा त्या मागचा उद्योग आहे. अर्थ खात्याने दीलेल्या निधीचा किती हिस्सा कुठे पोहचलाय याची खात्री नको का करायला. एवढा मोठा निधी देऊनही कंत्राटी रोजंदारी कर्मचारी मानधन मिळण्यासाठी रस्त्यावर येतात हे या मंत्री लोकांना का समजत नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा