तृणमूल नेत्याची मुक्ताफळे; पीओके म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन

‘एएनआय’शी बोलताना ओकली गरळ

तृणमूल नेत्याची मुक्ताफळे; पीओके म्हणजे दुसऱ्या देशाची जमीन

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके भारताला जोडण्याचे वक्तव्य केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरचा भारतामध्ये समावेश करण्याबद्दलचा ठाम विश्वास जाहीरपणे बोलून दाखविला आहे. अमित शाह यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आता उत्तर प्रदेशमधील भदोही लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार ललितेश पती त्रिपाठी यांनी गरळ ओकली आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.

“भाजपाला विकासाच्या मुद्यावर जनसमर्थन मिळत नाहीये कारण यांनी जो विकास केला आहे तो सर्वांगीण विकास नाहीये. विकासाच्या मुद्यावरुन निवडणुकीला भरकटवण्यासाठीच सराकर असे मुद्दे काढत आहे,” असं वक्तव्य ललितेश त्रिपाठी यांनी केलं आहे. तसेच ते म्हणाले की, सरकार जर पीओके परत घेण्याबद्दल बोलत असेल. याचाच अर्थ तुम्ही दुसऱ्या देशाची जमीन घेण्याची आणि युद्धाची घोषणा करताय. पीओके एकवेळ भारताचा भाग होता. एका राजकीय मंचावरुन युद्धाची घोषणा करु नये. देशाची मुलभूत गोष्टींसाठी झुंज सुरु असताना ही युद्धावर जाण्याची वेळ नाही. देशाकडे इतकी संसाधने नाहीत की देश दीर्घ काळाच्या युद्धात जाईल, अशा आशयचे वक्तव्य ललितेश त्रिपाठी यांनी केले आहे.

हे ही वाचा:

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भिंडेवर १०० वेळा कारवाई

भारताने केलेल्या चाबहार बंदराच्या करारावर तालिबान खुश; पाकिस्तानला पाजणार पाणी

‘युट्यूबर’ बनविण्याचे आश्वासन देऊन हिंदू मुलीला अडकवले जाळ्यात!

मध्य प्रदेशात निकाहमध्ये घूमर पाहिल्यानंतर मौलवी संतप्त!

यापूर्वीही अनेकदा विरोधकांचे पाकिस्तान प्रेम दिसून आले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर बोलताना जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला म्हणाले होते की, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत. शिवाय पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे भारताने लक्षात घ्यावं, असं वक्तव्यही काही नेत्यांनी केलं होतं. शिवाय आता निवडणुकीच्या दरम्यान पाकिस्तानी नेत्यांचा राहुल गांधी यांना पाठींबा असल्याची बाबही समोर आली होती. यावरून आरोप प्रत्यारोपही झाले होते.

Exit mobile version