पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पुढच्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ऑगस्ट २०२१ रोजी पीएम-किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पुढील हप्त्याचे वितरण करणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२.३० वाजता पार पडणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिन्गद्वारे हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी पंतप्रधान १९,५०० कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण करणार असून त्याचा लाभ सुमारे ९ कोटी ७५ लाख लाभार्थी घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान लाभार्थी कुटुंबियांशी संवाद देखील साधणार असून, राष्ट्राला संबोधित करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. त्याशिवाय पंतप्रधान कार्यालयातर्फे याबाबतचे माहितीपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इस दौरान देशभर के 9.75 करोड़ से अधिक किसानों के खातों में 19,500 करोड़ रुपये ट्रांसफर किए जाएंगे। मुझे PM-KISAN के कुछ लाभार्थियों के साथ संवाद का सुअवसर भी मिलेगा। इस योजना से जिस प्रकार हमारे किसान भाई-बहनों के जीवन में सकारात्मक परिवर्तन आया है, वो अत्यंत हर्ष का विषय है।
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2021
हे ही वाचा:
लाख लाख ‘सोनेरी’ तेजाची सारी दुनिया
८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?
नार्कोटिक्स अधिकाऱ्यांवरच त्याने केला हल्ला आणि…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ डिसेंबर २०१८ पासून या योजनेचा प्रारंभ केला. या योजने अंतर्गत गरीब शेतकऱ्यांना उपजिवीकेसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी २०००/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण ६०००/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो. या योजनेद्वारे शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत १.३८ लाख कोटी इतका सन्मान निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.