पंतप्रधान साधणार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद

२७ जानेवारीला 'परीक्षा पे चर्चा'

पंतप्रधान साधणार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जानेवारीला ‘परीक्षा पे चर्चा’ च्या आगामी आवृत्तीत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतील.

हा कार्यक्रम नवी दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी परीक्षा पे चर्चाच्या नोंदणीत दुपटीने वाढ झाल्याचे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. राज्य मंडळे, सीबीएससी, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती आणि इतर मंडळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होत आहेत.

परिक्षा पे चर्चासाठी ३१ लाखांहून अधिक विद्यार्थी, पाच लाखांहून अधिक शिक्षक आणि सुमारे दोन लाख पालकांनी नोंदणी केल्याचे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. १५० हून अधिक देशांतील विद्यार्थी, ५१ देशांतील शिक्षक आणि ५० देशांतील पालकांनीही या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे.

हे ही वाचा:

अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!

‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’

परिक्षा पे चर्चा या विशेष संवाद कार्यक्रमात पंतप्रधान देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तसेच परदेशात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधतात. जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी परीक्षेमुळे निर्माण होणाऱ्या तणावावर मात कशी करता येईल यावर ते चर्चा करतात.

Exit mobile version