पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पलामू येथील चिआंकी विमानतळ मैदानावर सभा पार पडली.भाजपचे उमेदवार बीडी राम यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये उपस्थित होते.भाजप उमेदवार विष्णू दयाल राम यांच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालो म्हणून देशवासीयांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि मी सेवा केली.याला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत.या २५ वर्षात आपल्या आशीर्वादाने मोदींवर एका पैशाचा घोटाळ्याचा आरोप झालेला नाही.मी आज पण पद, प्रतिष्ठा, सुख-समृद्धी यापासून दूर राहून आजही मी तसाच आहे, जसे तुम्ही मला इथे पाठवले होते.
हे ही वाचा:
केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना दिलासा; निर्यातीवरील बंदी हटवली
मी अमेठीत काय केले याचे उत्तर गांधी कुटूंबियाने इथून पळून जाऊन दिले!
ओडिशा: पुरी मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराने सोडले मैदान, पक्षाकडे तिकीट केले परत!
तांत्रिक बिघाड झालेल्या सैन्य दलाच्या हेलीकॉप्टरचे शेतात इमर्जन्सी लँडिंग
ते पुढे म्हणाले की, मोदींचा जन्म मौजमजेसाठी नाही तर मिशनसाठी झाला आहे. इंडी आघाडीवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेएमएम-काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती निर्माण केली आहे.ते लोक आपल्या मुलांसाठीच सर्व काही कमवत आहेत.मुलांसाठी त्यांनी बराच काळा पैसा मागे ठेवून जाणार आहेत.
तुमच्या या एका मताच्या बळामुळे आज संपूर्ण जगात भारताची लाट निर्माण होत आहे.तुम्हाला तुमच्या मताचे महत्त्व चांगलेच माहित आहे. तुम्ही तुमच्या एका मताने २०१४ मध्ये काँग्रेसचे भ्रष्ट सरकार हटवले होते. तुमच्या एका मताने भाजप-एनडीएचे सरकार स्थापन झाले.त्यामुळे तुम्हाला तुमच्या एका मताची ताकद माहिती आहे. तुमच्या मताची ताकद बघा की आज अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले गेले आहे, पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.