23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपीएम 'केअर्स'

पीएम ‘केअर्स’

Google News Follow

Related

मोदी सरकार उभारणार १०० कोविड विशेष रुग्णालये

सध्या देशातल्या १२ राज्यांत कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून देशभरात १०० नवीन कोविड रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही रुग्णालये कोविडच्या उपचारांनी सुसज्ज असतील.

देशातल्या महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तिसगढ, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, हरियाणा, राजस्थान या राज्यांत कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे ही हॉस्पिटल स्वतःच ऑक्सिजनची निर्मीती करू शकणाऱ्या यंत्रणेने सुसज्ज असणार आहेत. या बारा राज्यांना ४ हजार ८८० मेट्रीक टन, ५ हजार ६१९ मेट्रीक टन, ६ हजार ५९३ मेट्रीक टन ऑक्सिजनचा वापर त्यांची २०, २५ आणि ३० एप्रिल रोजी असणारी प्रस्तावित गरज पूर्ण करण्यासाठी देण्यात येणार आहे. या फंडातून १६२ ऑक्सिजन उत्पादन केंद्रे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

याबद्दल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर नी ट्वीटरवरून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. त्याबरोबरच त्यांनी पीएम केअर फंडाचा हिशोब मागणाऱ्यांना परस्पर चपराक दिली आहे असेही म्हटले आहे.

PM केअर्स फंडद्वारे देशात १०० नवी हॉस्पिटल्स उभारणार, केंद्राचा मोठा निर्णय… PM केअर्स फंडाचा हिशोब मागणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवेदनशील निर्णयाने परस्पर चपराक दिली आहे. निधीचा सुयोग्य वापर केल्याबद्दल पंतप्रधानांचे हार्दिक अभिनंदन

या शब्दात त्यांनी पंतप्रधानांच्या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

या पूर्वी पीएम केअर्सबद्दल महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने सातत्याने टीका केली होती. आता त्याच पीएम केअर्समधून उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयांचा महाराष्ट्रालाही फायदा होणार आहे. एरवी सातत्याने ‘आलं अंगावर ढकललं केंद्रावर’ धोरण राबवणाऱ्या ठाकरे सरकारकडून मोदी सरकारचे आभार पुन्हा एकदा मानले जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा