24 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरराजकारणजगाच्या पाठीवर भारताला नवी ओळख देणारे पंतप्रधान मोदी

जगाच्या पाठीवर भारताला नवी ओळख देणारे पंतप्रधान मोदी

Google News Follow

Related

आज नव्या वर्षात प्रवेश करताना जगाच्या पाठीवर भारताने आपली एक वेगळी छाप सोडली आहे. भारतासारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळ असणाऱ्या आणि सांस्कृतिक विविधता असणाऱ्या देशाने लसीकरणाचा विक्रम रचला. गुरुवार ३० डिसेंबर २०२१ रोजीच्या तारखेनुसार भारताने १.४४ अब्ज कोरोना प्रतिबंधित लसी दिल्या आहेत.

लसीकरण मोहीम हा एकमेव टप्पा भारताने यशस्वी पार केला आहे असे नाही. विदेशी गुंतवणूक, विकसित होणारी अर्थव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये भारताने उत्तम कामगिरी केली आहे. जगात कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना भारताने अशी उल्लेखनीय कामगिरी करण्याचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. २०१४ पासून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली आहे आणि तेव्हापासून भारताची एक नवी ओळख जगाला झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून म्हणजेच आधी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून मोदी हे राजकारणात आहेत.

त्यांच्या या राजकीय यशस्वी वाटचालीमागे आणि त्यांच्या उत्तम निर्णयामागे त्यांची काम करण्याची अनोखी आणि वेगळी पद्धत आहे. नरेंद्र मोदींच्या निर्णयामध्ये देशाच्या जनतेचा समावेश असतो, त्यांचा सहभाग असतो. जनतेचा विचार करून नरेंद्र मोदी निर्णय घेतात आणि त्याचमुळे जनता त्यांचे निर्णय स्वीकारण्यासाठी पुढाकार घेते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते असेच निर्णय घ्यायचे आणि तेच त्यांनी २०१४ पासून विशेषतः २०२१ मध्ये केले.

समोरच्याला म्हणजेच सामान्य जनतेला कोणताही त्रास न होऊ देता योजनांचा लाभ घेता आला पाहिजे याकडे मोदींचे लक्ष असते. नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना विधवा पेन्शन योजनेचे फॉर्म्स हे फॉर्म तयार केलेल्या अधिकाऱ्यांनाही संपूर्ण भरता आले नव्हते, तेव्हापासून नागरिकांना कमीतकमी अडथळे पार करून योजनेचा लाभ घेता येईल असा नरेंद्र मोदींचा प्रयत्न असतो.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये वर्षभरात दीडशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना खास भेट

नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी

झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित

नरेंद्र मोदींचे कामातील सातत्य हा सुद्धा त्यांच्या यशातील एक महत्त्वाचा पैलू आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंदिरांच्या भेटी या सतत सुरू असतात. दिखाव्यासाठी किंवा निवडणुका जवळ आल्या म्हणून हे दौरे नरेंद्र मोदी करत नाहीत. काही राजकारणी हे निवडणुका जवळ असल्यावर असे दौरे सुरू करतात. ‘आपण करू शकतो’ अशा पद्धतीची मोदींच्या कामाची शैली असते. याच शैलीच्या मदतीने मोदींनी अनेक आव्हानांना सहज मात देत देशाला विकासाच्या मार्गावर पुढे आणले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य आणि उत्तम वापर हे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या यशामागील एक कारण आहे. इतक्या जास्त प्रमाणात होत असलेले लसीकरण त्यासंबंधीची नोंद, रुग्णसंख्या याची नोंद ठेवणे हे तंत्रज्ञानाशिवाय शक्य नव्हते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ते शक्य करून दाखवले.

‘सबका साथ, सबका विकास’ या अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी देशातील, समाजातील सर्व घटकांचा विचार करून, त्यांना सोबत घेऊन देशाच्या विकासाकडे वाटचाल केली आहे. त्यामुळे भारताची आज जगात जी ओळख आहे त्याचे श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा