गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

लाल किल्ल्यावर गुरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शीख समुदायाला संबोधित करत मोठा संदेश दिला आहे. गुरु तेग बहादूर यांचा लाल किल्ल्याशी मोठा संबंध असून, ते शीख परंपरा आणि शौर्याचा आदर्श मांडतात, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी रात्री लाल किल्ल्यावरून भाषण केले आहे. लाल किल्ल्यावर आयोजित प्रकाश पर्वासाठी शीख समुदाय मोठ्या संख्येने जमला होता. शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांचे ४०० वे प्रकाश पर्व होते. या कार्यक्रमात ४०० शीख संगीतकारांनी सादरीकरण केले. हा कार्यक्रम दोन दिवसांचा होता. ज्यामध्ये पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते, तर दुसऱ्या म्हणजे कालच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
त्यावेळी पंतप्रधान मोदींनी शीख समुदायाला संबोधित केले.

पंतप्रधान म्हणाले, गुरु तेग बहादूरजींच्या बलिदानाने देशातील अनेक पिढ्यांना त्यांच्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या सन्मान, आदर आणि स्वाभिमानासाठी बलिदानाची प्रेरणा दिली आहे. कितीतरी मोठी वादळे आली आणि शांत झाली पण भारत अजूनही अस्तित्वात आहे आणि पुढे जात आहे. जेव्हा धार्मिक कट्टरता शिगेला पोहोचली होती, तेव्हा भारताला आपली ओळख वाचवण्यासाठी गुरु तेग बहादूरजी पुढे आले होते.

हे ही वाचा:

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

नवाब मलिकांना दणका; अटकेपासून संरक्षण नाहीच

भाजपा नेते आदित्य मिश्रांसह सहकाऱ्याचा अपघातात मृत्यू, तीन जखमी

‘मातोश्री’ दर्शनासाठी राणा दाम्पत्य मुंबईत

दरम्यान, शीख समाजाचे नववे गुरु तेग बहादूर यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले होते. १६७५ मध्ये मुघल शासक औरंगजेबाने त्यांना लाल किल्ल्यावरूनच फाशी देण्याचा आदेश दिला होता. गुरु तेग बहादूर हे शौर्याचे प्रतिक आहेत, जे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आपल्या वडिलांसोबत मुघलांशी लढण्यासाठी बाहेर पडले. त्याचे शौर्य पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांचे नाव तेग बहादूर असे ठेवले होते.

Exit mobile version