इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट

इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट

लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटली दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोनाचे संकट आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदय या संकटांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जी- २० या प्रगत राष्ट्रांच्या प्रमुखांची बैठक इटलीमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यात सहभागी होणार असून २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ते इटलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच पर्यावरणाशी संबंधित बैठकीसाठी ब्रिटनलाही जाणार आहेत.

कोरोनाच्या महामारी दरम्यान पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे कमी झाले होते. मार्चमध्ये बांगलादेश दौरा झाला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेसाठी, क्वाड बैठकीसाठी अमेरिका दौरा झाला होता. त्यानंतर जी- २० बैठकीसाठी हा दौरा होणार आहे.

हे ही वाचा:

मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

३४ मतदारांच्या निवडणुकीत आज शरद पवार-धनंजय शिंदे लढत

इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…

मुस्लिम समाजातील काही लोक का टाळत आहेत लसीकरण?

२९ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी इटलीच्या रोममध्ये पोहोचतील. कोरोनानंतर जागतिक आर्थिक व्यवस्थेत अपेक्षित असलेला सुधार, पर्यावरणातील बदल, दहशतवाद यासारखे मुद्दे चर्चेसाठी जी-२० च्या कार्यक्रम पत्रिकेवर असून जी- २० च्या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

चीन आणि रशिया हे देशही जी- २० चे सदस्य असले तरी चीनचे प्रमुख शी जीनपिंग आणि रशियाचे प्रमुख पुतीन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, पर्यावरण बदलाशी संबंधित ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सहभागासाठी मोदी ग्लासगो येथे जाणार आहेत. यावेळी ते ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचीही भेट घेणार आहेत.

Exit mobile version