‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नंतर आता पंतप्रधानांचे लक्ष ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’कडे

श्री रामानुजाचार्य हे ११ व्या शतकातील संत असून त्यांचा बैठकीच्या मुद्रेतील जगातील सर्वात दुसऱ्या मोठ्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. हैदराबाद मधल्या शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत आणि समाजसुधारक रामानुजाचार्यांच्या मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एकूण ४५ एकरच्या जागेत ही मूर्ती बांधण्यात आली असून २१६ फूट उंच असणाऱ्या या मूर्तीस ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ असे नाव देण्यात आले आहे.

येत्या ५ फ्रेब्रुवारीला हा सोहळा पार पडणार असून, पंतप्रधानांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण होणार आहे.  कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या १ हजार ३५ हवनकुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप टाकून हवन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

रामानुजाचार्यां यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास ‘रामानुज सहस्राब्दी समारंभ’ असे नाव दिले आहे. यावेळी रामानुजाचार्यांच्या दोन मूर्तींचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. २१६ फूट उंचीची ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांनी बनवली आहे. तर दुसरी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे. रामानुजाचार्यांच्या १२० वर्षांच्या प्रवासाच्या स्मरणार्थ १२० किलो सोन्यापासून ती बनवण्यात आली आहे. पुतळा करण्यासाठी सुमारे १८ महिन्यांचा कालावधी लागला.

हे ही वाचा:

नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू

धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!

राहुल यांच्या वक्त्यव्यावर केंद्रीय मंत्र्यांचा हल्लाबोल…

मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!

कोण होते संत रामानुजाचार्य?

वैष्णव संत रामानुजाचार्य यांचा जन्म १०१७ साली तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. कांची येथे गुरु यमुनाचार्यांकडून त्यांनी दीक्षा घेतली. श्रीरंगम येथील यथीराज नावाच्या संन्यासीकडून संन्यास घेतला. यानंतर त्यांनी भारतभर फिरून वेदांत आणि वैष्णव धर्माचा प्रसार केला.तेसच, त्यांनी श्रीभाष्याम् आणि वेदांत संग्रह या ग्रंथांची रचना केली. रामानुजाचार्य यांनी वयाच्या १२० व्या वर्षी म्हणजेच ११३७ मध्ये श्रीरंगम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

Exit mobile version