नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण

नवीन संसद भवनाचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, ११ जुलै रोजी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावरील वीस फूट उंच अशोक स्तंभाचे अनावरणही केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना कामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला. अशोक स्तंभाचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. अशोक स्तंभाचे वजन ९ हजार ५०० किलो आहे जे कांस्य धातूपासून बनलेले आहे. अशोक स्तंभाला आधार देण्यासाठी ६ हजार ५०० हजार किलोग्रॅमची आधारभूत रचना तयार करण्यात आली आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर आणखी २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा:

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रचिन्ह लावण्याची संकल्पना आणि प्रक्रिया क्ले मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सपासून कांस्य कास्टिंग आणि पॉलिशिंगपर्यंतच्या तयारीच्या आठ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान, २०२० मध्ये, नवीन संसद भवन बांधण्याचा प्रकल्प टाटा प्रोजेक्ट्सला ९७१ कोटी रुपयांना मिळाला होता. सरकारने इमारतीसाठी ऑक्टोबर २०२२ ची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

Exit mobile version