पंतप्रधान मोदी शुक्रवारी दाखवणार वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

दुपारी होणार मुंबईत दाखल

पंतप्रधान मोदी शुक्रवारी दाखवणार वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या आंतरराज्य प्रवास करणाऱ्या मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशा दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उद्या दहा तारखेला पंतप्रधान सीएसटी स्थानकावरून दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. संपूर्ण भारतीय बनावटीची असणारी ह्या ट्रेन पहिल्या सेमीस्पीड गतराईं असतील. पूर्ण वातानुकूलित, ३६० अंशांमध्ये फिरणाऱ्या खुर्च्या, वाय फाय,अद्ययावत सस्पेंशन, सुविधा या रेल्वे ची खासियत असणार आहे.

पंतप्रधानांनी या ट्रेनना हिरवा झेंडा दाखवल्यावर त्या रवाना होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी मरोळ येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येतील. त्यामुळे उद्या संपूर्ण मुंबईत पोलिसांची चोख सुरक्षा व्यवस्था असणार आहे. त्यासाठी मुंबई पोलीस आधीच सतर्क झाले आहेत. याबाबत वरिष्ठांची याबाबत व्हिडिओ कॉन्फेरंसिंग बैठक झाली आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

पंतप्रधान मोदी यांचा कसा असेल दौरा

पंतप्रधान मोदी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल. होऊन दोन वाजून ४५ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचतील. फ्लॅट क्रमांक १८ वरती दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारत या ट्रेन कडे जाणार आहेत. याच ट्रेन मध्ये ते लहान मुलांबरोबर सात मिनिटे गप्पा मारणार आहेत. त्यानंतर या ट्रेन ना हिरवा झेंडा दाखवल्यावर  पंतप्रधानांना एक मिनिटांचे यासंदर्भातील सादरीकरण देण्यात येणार आहे. एकूण या ठिकाणी हा १५ मिनिटांचा कार्यक्रम असेल. पुन्हा दुपारी तीन वाजून ५५ मिनिटांनी ते निघून चार वाजून २० मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील. मुंबई विमानतळ ते मरोळ करणे प्रवास करणार आहेत.

मरोळ येथील कार्यक्रमाला ते साडेचार वाजता पोहोचतील. मरोळ ला सैफी ट्रस्टच्या नवीन कॅम्पसचे उदघाटन करणार आहेत. संध्याकाळी पाच वाजून ५० मिनिटांनी ते मरोळ वरून विमानतळावरून सहाच्या विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत.

Exit mobile version