पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जुलै रोजी झारखंड दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी विमानतळ आणि एम्सच्या रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. गुरुवार, ३० जून रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह आणि नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांच्याशिवाय झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा गुरुवारी देवघरला पोहोचले आहेत.
१२ जुलैला पंतप्रधान मोदी सर्वप्रथम देवघर येथे बाबा वैद्यनाथ यांची यांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर देवघर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी ते देवघर कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत. विमानतळाचे उद्घाटन झाल्यांनतर दुसऱ्या दिवसापासूनच येथून दिल्ली, मुंबई, कोलकाता येथे उड्डाणे घेतली जातील. अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक सचिव यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
शिंदे सरकारचा मोठा निर्णय; मेट्रो कारशेड आरेतच!
संजय राऊत आज ईडीसमोर हजर होणार
सेटलवाड अटकेविरोधातील आंदोलनात कॅथलिक समाजाला ओढले जात आहे!
मिलिंद घाग महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष
यावेळी मुख्य सचिव सुखदेव सिंह दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम देवघर विमानतळावर येतील, तेथे ते देवघर विमानतळाचे उद्घाटन करतील. त्यानंतर विमानतळावरून देवघर बाबा मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तेथे सुमारे ४५ मिनिटांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देवघर कॉलेजच्या मैदानावर कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. १२ जुलै रोजी या प्रमुख तीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय त्याच दिवशी पंतप्रधान मोदी एम्सच्या २०० खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटनही करणार आहेत.