जर्मनीचे कुलपती ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेसाठी जर्मनीला जाणार आहेत. २६ आणि २७ जूनला पंतप्रधान मोदी जर्मनीला जाणार आहेत. G7 शिखर परिषद जर्मनीच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जात आहे. ज्यामध्ये अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी दौऱ्यात पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांचा समावेश असलेल्या दोन सत्रांना संबोधित करण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सहभागी असलेल्या काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकही घेतील.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत
शिखर परिषदेनंतर २८ जूनला पंतप्रधान मोदी युएईला भेट देणार आहेत. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनाबद्दल शोकभावना व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी युएईला भेट देणार आहेत. तसेच यूएईचे नवे राष्ट्रपती आणि अबु धाबीचे शासक म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची निवड झाल्याबद्दल पंतप्रधान त्यांचे अभिनंदन देखील करतील. त्याच रात्री 28 जून रोजी पंतप्रधान यूएईहून भारतात परतणार आहेत.