सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी करणार राष्ट्राला संबोधित!

सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी करणार राष्ट्राला संबोधित!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशाला संबोधित करणार आहेत. शुक्रवार, २२ ऑक्टोबर रोजी १० वाजता मोदी हे राष्ट्राला उद्देशून महत्वाचा संदेश देणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान आज नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताने कोविड महामारी विरोधातील लढाईत १०० कोटी लसी देण्याची जी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्या अनुषंगानेच पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

काल म्हणजेच गुरुवार २१ ऑक्टोबर रोजी भारताने इतिहास रचला आहे. भारताने कोविड महामारी विरोधातील आपल्या लढाईत एक महत्वाचा पल्ला गाठला असून एकूण १०० कोटी लसीच्या मात्र देण्याचा विश्वविक्रम भारताने रचला आहे. भारताची हि लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम असून भारताने अवघ्या ९ महिन्यांमध्ये १०० कोटी लसी देण्याचा टप्पा ओलांडला आहे.

हे ही वाचा:

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

भारताच्या या कामगिरीसाठी जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांपासून ते विविध राष्ट्रांच्या प्रमुखांपर्यंत समाजाच्या प्रत्येक स्तरातून भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचे आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले जात आहेत.

Exit mobile version