27 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारणडबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा कायापालट होईल

डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा कायापालट होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आश्वस्त

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटीं रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं” बीकेसी येथे झालेल्या सभेत पंतप्रधानांनी डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे असं सांगितले .

सभेत पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. माझ्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची मराठीतून सुरुवात करून मुंबईकरांची मने जिंकली. आज मुंबई विकासाशी निगडित ४० हजार कोटी रुपयांच्या कामांचा शिलान्यास आणि पायाभरणी झाली आहे. मुंबईसाठी अत्यंत गरजेची असलेली मेट्रो असो छत्रपती शिवाजी टर्मिनसचे आधुनिकीकरण असो, रस्ते सुधारणा असो बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरु करण्यात येत असलेला आपला दवाखाना असो आज विकासाशी निगडित ४० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शिलान्यास आणि पायाभरणी झाली आहे.

पंतप्रधान स्व निधी योजने अंतर्गत पैसे खात्यात पोहचलेले आहेत अशा सगळ्या लाभार्थींना आणि प्रत्येक मुंबईकराला मी खूप शुभेच्छा देतो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज भारत मोठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्याचे साहस करत आहे. नाहीतर आतापर्यंत फक्त आणि फक्त गरिबीची चर्चा सुरू होती जगातल्या इतर लोकांकडून मदत मागणं यातच आपला वेळ गेला. कसं तरी करून आपली गुजराण करत होतो . पण स्वातंत्र्यानंतर जगाला पण भारताच्या मोठ्या मोठ्या संकल्पनावर भरवसा आहे हे पहिल्यांदाच होत आहे. आज सगळ्यांना असं वाटत आहे की, भारत जे करत आहे ते गतिशील विकासाठी आवश्यक आहे असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे डोळे उघडले? म्हणतात, भारताशी तीन युद्धे केल्यामुळे झालो गरीब

जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय

पाकिस्तानात १३ वर्षांच्या हिंदू मुलींना पळवून होत आहेत विवाह, धर्मांतरण

महाराष्ट्राला मिळाली भरभक्कम गुंतवणूक

पंतप्रधान पुढे म्हणाले की , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला विकसित भारताच्या निर्माणाची जेवढी उत्सुकता भारताला आहे तेवढाच आशावाद जगामध्ये पण दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दावोसचा आपला अनुभव वर्णन करत होते हाच अनुभव आम्हाला सगळीकडे येत आहे. भारताला घेऊन संपूर्ण जगात इतकी सकारात्मकता अशासाठी आहे. कारण आज सगळ्यांना वाटतं की भारत आपल्या सामर्थ्याचा खूप चांगल्या प्रकारे सदुपयोग करत आहे. आजच्या भारतामध्ये डबल इंजिनच्या सरकार प्रबळ रूपाने प्रकट होत आहे. आपण अशी वेळ बघितली आहे की जेव्हा गरीबाच्या कल्याणाचे पैसे घोटाळ्यांची भेट बनत होती याचे नुकसान करोडो देशवासीयांना भोगावे लागले. पण गेल्या आठ वर्षात आम्ही हा दृष्टिकोन बदलला आहे आज भारत भविष्यकालीन विचार करत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा