‘जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल’

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीकेला नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल’

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी गुजरातमधील कलोल येथे एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी रावणाबाबत केलेल्या टीकेला नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला रामसेतूचाही तिटकारा आहे. काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाचा अवमान करण्यासाठी कोण सर्वाधिक शिव्या देऊ शकेल, याची स्पर्धा लागली आहे. मला शिवीगाळ करण्यासाठी रावणाला रामायणातून आणले. रामभक्ताला रावण म्हणणे चुकीचे आहे, असं मोदी म्हणाले. खर्गे यांचा मी आदर करतो, पण त्यांना जे सांगण्यात आलं तेच त्यांना बोलावे लागले असेल. गुजरात हे रामभक्तांचे राज्य आहे, हे काँग्रेसला माहीत नाही, असंही मोदी म्हणाले. जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

हे ही वाचा : 

कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या जत्रेला सुरुवात

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचे विष महाराष्ट्राच्या राजकारणात कालवले

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

पुढे मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वी एका काँग्रेस नेत्याने मोदी कुत्र्याप्रमाणे मारतील असं म्हटले होते. तर दुसऱ्या नेत्याने मोदी हिटलरसारखे मरतील असं म्हटले होते. कोणी मला रावण म्हणतो तर कोणी झुरळ म्हणतो. तर काँग्रेसच्या एका नेत्याने मोदींना या निवडणुकीत त्यांनी जागा दाखवून देऊ असं म्हटलं होते. ते कमी होते तर काँग्रेसने खर्गे यांना इथे पाठवले. गुजरातने मला जी ताकद दिली आहे त्यामुळे काँग्रेस त्रस्त असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Exit mobile version