‘कितीही ‘काळी जादू’ केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही’

‘कितीही ‘काळी जादू’ केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही’

काँग्रेसच्या ‘काळ्या निषेधा’वर पंतप्रधान मोदींचा खणखणीत इशारा

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने काळे कपडे घालून आंदोलन केलं होत. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या कपड्यांमध्ये निदर्शने करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली आहे. कितीही काळी जादू केली तरी जनता विश्वास ठेवणार नाही, अशी टीका पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, १० ऑगस्ट रोजी पानिपत येथे इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशातही असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडलेले आहेत. सरकारविरोधात खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही.अशा नैराश्यात हे लोक आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला ते आम्ही ५ ऑगस्टला पाहिले. त्यांना असे वाटते की,काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल, परंतु त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही हुशारी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही बसणार नाही.

ही वाचा:

जेवणाचा डबा घेऊन परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

परवानगी घ्या मग संजय राऊत यांना भेटा!

आमिर खानने ‘तिला’ का सॅल्यूट केला नाही?

दहशतवादी हल्ल्याच्या कटप्रकरणी एम आय एमच्या सदस्याला अटक

आज अमृत महोत्सवात देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे. या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशातील अशा लोकांची मानसिकताही समजून घेणे गरजेचे आहे. राजकारणात स्वार्थ असेल तर कुणीही येऊन पेट्रोल-डिझेल मोफत देण्याची घोषणा करू शकते. अशी पावले आपल्या मुलांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतील, देशाला स्वावलंबी होण्यापासून रोखतील. अशा स्वार्थी धोरणांमुळे देशातील प्रामाणिक करदात्याचा भारही वाढणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

Exit mobile version